गुरुवार, दि. 31/08/23 रोजी लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा येथे विश्व संस्कृत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संस्कृत विभागातर्फे कारण्यात आले.
श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला अर्थात रक्षा बंधन दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो.त्याचे उद्देश्य संस्कृत भाषेला वाव देणे व त्याचे संवर्धन करणे. भारतीय संस्कृतीचा समृद्ध इतिहास संस्कृतच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आज ही त्या भाषेत तो सुरक्षित आहे. वेद, भगवतगिता, दर्शन, योग अध्यात्म, रामायण, महाभारत, पुराण, आयुर्वेद, चरक संहिता, कामसूत्र, विमान शास्त्र, शिल्प कला ग्रंथ, शल्य चिकित्सा हे आपल्या समृद्ध सभ्यतेचे आणि प्राचीन ज्ञान परंपरेचे ठोस पुरावे आहेत हे संस्कृत भाषेत सुरक्षित आहेत. तसेच बुद्ध चरितं, जैन धर्माचे ग्रंथ सुद्धा या भाषेत सुरक्षित आहेत. म्हणून संस्कृतला भारतीय संस्कृतीची आत्मा म्हटलेलं आहे. आज पण आपल्या देशातील महत्त्वपूर्ण संस्थांची ध्येय वाक्य संस्कृत मध्येच आहेत. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून छत्रपति शिवाजी कॉलेज येथील डॉ. ऋषिकेश काळे सर उपस्थीत होते.
पाणिनीच्या व्याकरणाची भाषा सूत्रमय आहे. कमीत कमी शब्दात अधि- कात अधिक आशय व्यक्त करणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य. चार हजार सूत्रांच्या मर्यादित संचाद्वारे अमर्याद शब्दांची आणि वाक्यांची निर्मिती करणारे पाणिनीचे व्याकरण हाच एक प्राचीन संगणक आहे. या सूत्रांकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला, तरी संगणकाला भरवल्या जाणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाशी (programme) त्याची तुलना करण्याचा मोह होतो. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर पाणिनीची अष्टाध्यायी हा संस्कृत भाषेच्या विश्लेषणाचा (language processing) एक कार्यक्रम (programme) आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. पाणिनीने तयार केलेला हा ‘ कार्यक्रम ‘ इतका परिपूर्ण आहे की, याच भाषेत युरोपातल्या कोणत्याही भाषेचा कार्यक्रम संगणकाला पुरवला तर त्याकडून होणारे आशयसंक्रमणाचे काम अधिकाधिक परिपूर्ण होईल, असा विश्वास काही विद्वानांना वाटतो. असे मत प्रा. डॉ. ऋषीकेश काळे यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमात – कु. राधा कुलकर्णी व कु. गायत्री देशपांडे यांनी संस्कृत गीत प्रस्तुत केले.
No comments:
Post a Comment