Saturday, July 2, 2022

‘कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ नामक भित्ती पत्रिका प्रकाशित करण्यात आली.

 ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार” 

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

संस्कृत विभाग  

       महाकवी कालिदास दिन   ०१/०७/२०२२ 


             शुक्रवार दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘महाकवी कालिदास दिना’ निमित्त ‘कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ नामक भित्ती पत्रिका प्रकाशित करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सर, ज्युनि.विभागाचे उप-प्राचार्य सुनील शिंदे सर, प्रा.बी.एस.कालगावकर ज्युनि. विभागाच्या संस्कृत विषयाच्या अध्यापिका राणी अवघडे तसेच इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुणांचे स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांच्या हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन झाले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी  भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. 






०१/०७/२०२२

            आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते. ‘उपमा’ या अलंकाराचा वैशिष्टयपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत. 

 

       C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\kalidas din\photos\IMG-20220701-WA0047.jpg

       C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\kalidas din\photos\IMG-20220701-WA0037.jpg

महाकवी कालिदास दिन

Spread of education for knowledge, application and inculcation of good values 

Shikshan Maharshi Dr. Bapuji Salunkhe 

Shri. Swami Vivekanand Shikshan Santha, Kolhapur 

Lal Bahadur Shastri College of Arts, Science and Commerce, Satara Department of Sanskrit 

अहवाल 

" कालिदास दिन "

 

क्रियाकलापाचे शीर्षक: “महाकवी कालिदासांचे काव्यसौंदर्य     

·         उद्दिष्टे:

१.      संस्कृत साहित्यातील कविशिरोमणी असणारे महाकवी कालिदासांचे भारतीय साहित्यात असलेले अमूल्य योगदान लोकांमधे पोचवणे.

२.      त्यांच्या साहित्यातून वर्णित केलेला तत्कालीन भारतीय समाज, संस्कृती, लोकव्यवहार, नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती यांचे वर्णन सांगणे.

३.      विद्यार्थ्यांमध्ये महाकवी कालिदासाच्या साहित्याविषयी उत्सुकता निर्माण करणे.

४.      विश्व साहित्यात महकविकालिदासाचे महत्व सांगणे.

∙दिवस आणि तारीख:  शुक्रवार दिनांक ०१/०७/२०२२

∙उदघाटन:  डॉ. आर. व्ही. शेजवळ

∙साधन व्यक्ती:

१)      प्रा. मयूर धारक

 ∙वितरित विषय:

१.      आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.

२.       कालिदास हा शृंगाराचा अधिपती होता, पण त्याने स्वैराचाराला कधीच प्रतिष्ठा दिली नाही. परंतु, त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि त्याचे साहित्य याचा विपर्यास झालेला दिसतो.

३.      कालिदास हे भारतीय साहित्यातील प्रमुख कवी आहेत. त्यांनी ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘मेघदूत’ आणि ‘अभिज्ञानशाकुंतलम्’ यासह संस्कृत भाषेत अनेक महत्त्वाची कविता आणि नाटके लिहिली आहेत.

४.      कालिदासाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची विनोदबुद्धी की, जिचे वावडे बहुतेक विद्वानांना असते.

५.      कालिदासांच्या काव्यात आणि नाटकात त्यांची कला, रस, भावना आणि सौंदर्याची दाद पुरेशी मानली जाते.

६.      कालिदास रचित सुभाषिते.

पापशंकी अतिस्नेह:।

म्हणजे मानवी मन अति स्नेहात असणार्‍या व्यक्तीबाबत अनिष्टाची शंका घेते.

मरणं प्रकृतिः शरीरिणां

मृत्यू हा अटळ आहे. तो समोर दिसत असेल तर त्याला स्वीकारायला आपण घाबरतो.

परदु:ख शीतलम।

एखाद्या दु:खाची दाहकता आपण स्वतः अनुभवलयाशिवाय समजत नाही.

 

∙सहभागींची संख्या:46

∙समापन कार्याचा तपशील:  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी अध्यक्षीय मनोगाय मनोगत व्यक्त केले व सर्वांना कालिदासदिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्कृतचा साहित्य क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला.

कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. एम.बी. धारक सर.






                                              


About Me

My photo
Satara, Maharashtra, India
Sanskrit is ancient language of India. As we know sanskrit language is full of all type of knowledge. Founder of Shri swami vivekanand shikshan sanstha , kolhapur Shikshanmahrshi Dr. Bapuji Salunkhe loved sanskrit language who was expert on that. He was started sanskrit teaching in sanstha . In Sanstha Lal Bahadur Shastri Arts comm. And science college is only one college where PG level course in sanskrit available for everyone. Viva –voce are arranged for Ph.D. students of sanskrit under shivaji Uni. Kolhapur. This is only one centre in Shivaji Uni. Kol. For sanskrit students . Mostly economically back ward class and muslim communities students as well as girl students are being taken advantages of sanskrit language. Famous scholar of Maharashtra state Respected Dr. A.H. Salunkhe And Mahakavi Kalidas Sanskrit Sadhna Purskar rewred Smt Dr. S.S.Rajebhonsale are given their great contribution for college and department