“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.
संस्कृत विभाग
“विश्व संस्कृत दिवस महोत्सव”
मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत “विश्व संस्कृत दिवस महोत्सव” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, संस्कृत ग्रंथप्रदर्शन तसेच भित्तीपत्रिका प्रकाशन असे विभिन्न उपक्रम ठेवण्यात आले होते. प्रथमतः संस्कृत विषयातील उपयुक्त व दुर्मिळ अश्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. तदनंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्याद्वारा बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच ज्युनि. विभागाचे उप प्राचार्य यांनी ही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रा.सौ.एस.वाय दुसाणे मैडम यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.
मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते संस्कृत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.
उत्तमम्
ReplyDelete