Spread of education for knowledge, application and
inculcation of good values
Shikshan
Maharshi Dr. Bapuji Salunkhe
Shri. Swami Vivekanand Shikshan Santha, Kolhapur
Lal
Bahadur Shastri College of Arts, Science and Commerce, Satara Department
of Sanskrit
अहवाल
"
कालिदास दिन "
क्रियाकलापाचे शीर्षक: “महाकवी कालिदासांचे
काव्यसौंदर्य”
·
उद्दिष्टे:
१.
संस्कृत साहित्यातील
कविशिरोमणी असणारे महाकवी कालिदासांचे भारतीय साहित्यात असलेले अमूल्य योगदान लोकांमधे
पोचवणे.
२.
त्यांच्या साहित्यातून वर्णित केलेला तत्कालीन भारतीय समाज, संस्कृती, लोकव्यवहार, नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती
यांचे वर्णन सांगणे.
३.
विद्यार्थ्यांमध्ये महाकवी कालिदासाच्या साहित्याविषयी उत्सुकता
निर्माण करणे.
४.
विश्व साहित्यात महकविकालिदासाचे महत्व सांगणे.
∙दिवस आणि तारीख: शुक्रवार दिनांक ०१/०७/२०२२
∙उदघाटन: डॉ.
आर. व्ही. शेजवळ
∙साधन व्यक्ती:
१)
प्रा. मयूर धारक
∙वितरित विषय:
१.
आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो.
२.
कालिदास हा शृंगाराचा अधिपती होता, पण त्याने स्वैराचाराला कधीच प्रतिष्ठा दिली नाही. परंतु, त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि
त्याचे साहित्य याचा विपर्यास झालेला दिसतो.
३.
कालिदास हे
भारतीय साहित्यातील प्रमुख कवी आहेत. त्यांनी ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘मेघदूत’ आणि
‘अभिज्ञानशाकुंतलम्’ यासह संस्कृत भाषेत अनेक महत्त्वाची कविता आणि नाटके लिहिली
आहेत.
४.
कालिदासाचे अजून
एक वैशिष्ट्य म्हणजे, त्याची विनोदबुद्धी की, जिचे वावडे बहुतेक विद्वानांना असते.
५.
कालिदासांच्या
काव्यात आणि नाटकात त्यांची कला, रस, भावना आणि सौंदर्याची दाद पुरेशी मानली जाते.
६.
कालिदास रचित
सुभाषिते.
पापशंकी अतिस्नेह:।
म्हणजे
मानवी मन अति स्नेहात असणार्या व्यक्तीबाबत अनिष्टाची शंका घेते.
मरणं प्रकृतिः शरीरिणां
मृत्यू
हा अटळ आहे. तो समोर दिसत असेल तर त्याला स्वीकारायला आपण घाबरतो.
परदु:ख शीतलम।
एखाद्या
दु:खाची दाहकता आपण स्वतः अनुभवलयाशिवाय समजत नाही.
∙सहभागींची
संख्या:46
∙समापन कार्याचा
तपशील: महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.
व्ही. शेजवळ यांनी अध्यक्षीय मनोगाय मनोगत व्यक्त केले व सर्वांना कालिदासदिनाच्या
शुभेच्छा दिल्या. संस्कृतचा साहित्य क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला.
No comments:
Post a Comment