“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.
संस्कृत विभाग
महाकवी कालिदास दिन ०१/०७/२०२२
शुक्रवार दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘महाकवी कालिदास दिना’ निमित्त ‘कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ नामक भित्ती पत्रिका प्रकाशित करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सर, ज्युनि.विभागाचे उप-प्राचार्य सुनील शिंदे सर, प्रा.बी.एस.कालगावकर ज्युनि. विभागाच्या संस्कृत विषयाच्या अध्यापिका राणी अवघडे तसेच इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुणांचे स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांच्या हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन झाले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
०१/०७/२०२२
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते. ‘उपमा’ या अलंकाराचा वैशिष्टयपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत.