Monday, December 11, 2023
Friday, September 1, 2023
विश्व संस्कृत दिवस २०२३
गुरुवार, दि. 31/08/23 रोजी लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा येथे विश्व संस्कृत दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संस्कृत विभागातर्फे कारण्यात आले.
श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला अर्थात रक्षा बंधन दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो.त्याचे उद्देश्य संस्कृत भाषेला वाव देणे व त्याचे संवर्धन करणे. भारतीय संस्कृतीचा समृद्ध इतिहास संस्कृतच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आज ही त्या भाषेत तो सुरक्षित आहे. वेद, भगवतगिता, दर्शन, योग अध्यात्म, रामायण, महाभारत, पुराण, आयुर्वेद, चरक संहिता, कामसूत्र, विमान शास्त्र, शिल्प कला ग्रंथ, शल्य चिकित्सा हे आपल्या समृद्ध सभ्यतेचे आणि प्राचीन ज्ञान परंपरेचे ठोस पुरावे आहेत हे संस्कृत भाषेत सुरक्षित आहेत. तसेच बुद्ध चरितं, जैन धर्माचे ग्रंथ सुद्धा या भाषेत सुरक्षित आहेत. म्हणून संस्कृतला भारतीय संस्कृतीची आत्मा म्हटलेलं आहे. आज पण आपल्या देशातील महत्त्वपूर्ण संस्थांची ध्येय वाक्य संस्कृत मध्येच आहेत. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून छत्रपति शिवाजी कॉलेज येथील डॉ. ऋषिकेश काळे सर उपस्थीत होते.
पाणिनीच्या व्याकरणाची भाषा सूत्रमय आहे. कमीत कमी शब्दात अधि- कात अधिक आशय व्यक्त करणे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य. चार हजार सूत्रांच्या मर्यादित संचाद्वारे अमर्याद शब्दांची आणि वाक्यांची निर्मिती करणारे पाणिनीचे व्याकरण हाच एक प्राचीन संगणक आहे. या सूत्रांकडे एक ओझरता दृष्टिक्षेप टाकला, तरी संगणकाला भरवल्या जाणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाशी (programme) त्याची तुलना करण्याचा मोह होतो. वेगळ्या शब्दात सांगायचे, तर पाणिनीची अष्टाध्यायी हा संस्कृत भाषेच्या विश्लेषणाचा (language processing) एक कार्यक्रम (programme) आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. पाणिनीने तयार केलेला हा ‘ कार्यक्रम ‘ इतका परिपूर्ण आहे की, याच भाषेत युरोपातल्या कोणत्याही भाषेचा कार्यक्रम संगणकाला पुरवला तर त्याकडून होणारे आशयसंक्रमणाचे काम अधिकाधिक परिपूर्ण होईल, असा विश्वास काही विद्वानांना वाटतो. असे मत प्रा. डॉ. ऋषीकेश काळे यांनी या संदर्भात बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमात – कु. राधा कुलकर्णी व कु. गायत्री देशपांडे यांनी संस्कृत गीत प्रस्तुत केले.
Saturday, April 15, 2023
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पंधरवडा’ निमित्त संस्कृत विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पंधरवडा’
वक्तृत्व स्पर्धा
अहवाल
‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पंधरवडा’ निमित्त संस्कृत विभागातर्फे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दिनांक
१३/०४/२०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता विवेकानंद सभागृह (B22) येथे करण्यात आले .
वक्तृत्व स्पर्धेला परीक्षक क्र.१. डॉ. संतोष बंडगर आणि परीक्षक क्र. २. प्रा. एस.
एस. शेलार होते. स्पर्धेत विजेते विद्यार्थ्यंना प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांच्या
हस्ते प्रमाणपत्र आणि बक्षीस राशी देऊन सम्मानित करण्यात आले.
वक्तृत्व स्पर्धा बक्षीस
अ.क्र. |
निकाल |
बक्षीस |
१. |
प्रथम क्रमांक |
प्रमाणपत्र + ३५१रु. |
२. |
द्वितीय क्रमांक |
प्रमाणपत्र + २५१रु. |
३. |
तृतीय क्रमांक |
प्रमाणपत्र + १५१रु. |
४. |
उत्तेजनार्थ प्रथम |
प्रमाणपत्र |
५. |
उत्तेजनार्थ द्वितीय |
प्रमाणपत्र |
वक्तृत्व स्पर्धा निकाल दि.
१३/०४/२०२३
अ.क्र. |
निकाल |
स्पर्धकाचे नाव |
१. |
प्रथम क्रमांक |
आकांक्षा दशरथ हगवणे |
२. |
द्वितीय क्रमांक |
पायल विकास चव्हाण |
३. |
तृतीय क्रमांक |
अर्पिता नथुराम भिलारे |
४. |
उत्तेजनार्थ प्रथम |
ऋतुजा प्रकाश जरक |
५. |
उत्तेजनार्थ द्वितीय |
हुसेन दुर्गा घोरपडे |
Sunday, February 12, 2023
'एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ' आधुनिक्याः साहित्यस्य च परिवर्तमानं स्वरूपम्'
Monday, December 5, 2022
शनिवार दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘गीता जयंती’ भित्ती पत्रिका प्रकाशन रुपात साजरी करण्यात आली.
“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.
संस्कृत विभाग
गीता जयंती
शनिवार
दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘गीता जयंती’
भित्ती पत्रिका प्रकाशन रुपात साजरी करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ, इतर विषयाचे
प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम कु. संजना गायकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाची
प्रस्तावना केली. कु. कुलकर्णी राधा या विद्यार्थिनीच्या हस्ते प्राचार्यांना
श्रीमद्भगवतगीता व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांच्या
हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.देशपांडे
गायत्री हिने भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी तृतीय
वर्षातील विद्यार्थिनी योगिता भोसले यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न
झाला.
गीताजयंती निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.ए.भाग २ ची विद्यार्थ्यांनी कु.संजना गायकर.
भित्तीपत्रिका प्रकाशन करताना महाविद्यालयाचे
प्रा.डॉ.आर.व्ही.शेजवळ
भित्तीपत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगताना
बी.ए.भाग ३ ची विद्यार्थिनी कु.गायत्री देशपांडे
About Me
- Department of Sanskrit
- Satara, Maharashtra, India
- Sanskrit is ancient language of India. As we know sanskrit language is full of all type of knowledge. Founder of Shri swami vivekanand shikshan sanstha , kolhapur Shikshanmahrshi Dr. Bapuji Salunkhe loved sanskrit language who was expert on that. He was started sanskrit teaching in sanstha . In Sanstha Lal Bahadur Shastri Arts comm. And science college is only one college where PG level course in sanskrit available for everyone. Viva –voce are arranged for Ph.D. students of sanskrit under shivaji Uni. Kolhapur. This is only one centre in Shivaji Uni. Kol. For sanskrit students . Mostly economically back ward class and muslim communities students as well as girl students are being taken advantages of sanskrit language. Famous scholar of Maharashtra state Respected Dr. A.H. Salunkhe And Mahakavi Kalidas Sanskrit Sadhna Purskar rewred Smt Dr. S.S.Rajebhonsale are given their great contribution for college and department
-
एक दिवसीय राष्ट्रीय परिषद ' 'आधुनिक्याः साहित्यस्य च परिवर्तमानं स्वरूपम्' अहवाल "क्र...
-
संस्कृत विभगाअंतर्गत दिनांक २४/०८/२०१९, वार :- शनिवार,रोजी संस्कृत दिनानिमित्त “संस्कृत भाषा व तिचे महत्त्व” या विषयावर घेण्यात आलेल्या कार्...