“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित
लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.
संस्कृत विभाग
गीता जयंती
शनिवार
दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘गीता जयंती’
भित्ती पत्रिका प्रकाशन रुपात साजरी करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ, इतर विषयाचे
प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम कु. संजना गायकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाची
प्रस्तावना केली. कु. कुलकर्णी राधा या विद्यार्थिनीच्या हस्ते प्राचार्यांना
श्रीमद्भगवतगीता व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांच्या
हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.देशपांडे
गायत्री हिने भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी तृतीय
वर्षातील विद्यार्थिनी योगिता भोसले यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न
झाला.
गीताजयंती निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.ए.भाग २ ची विद्यार्थ्यांनी कु.संजना गायकर.
भित्तीपत्रिका प्रकाशन करताना महाविद्यालयाचे
प्रा.डॉ.आर.व्ही.शेजवळ
भित्तीपत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगताना
बी.ए.भाग ३ ची विद्यार्थिनी कु.गायत्री देशपांडे